तालुक्यात भात पीक कापणीला सुरुवात

तहसीलदार रामदास झळके यांनी सहकाऱ्यांसह शेत मळ्यात उतरत केली भात कापणी

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यात भात पीक कापणीला नुकतीच सुरू सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार रामदास झळके स्वतः शेताच्या मळ्यात उतरत सहकाऱ्यांसमवेत भुईबावडा येथे भात कापणी केली. भात कापणी प्रयोग कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. शासकीय कामकाजात नेहमी व्यस्त असलेल्या तहसीलदार यांनी हातात खुरपे घेत सर्व कामात आपण अग्रेसर असल्याचे दाखवून दिले. तसेच शेतात कापणी करत सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा घाम काढला. यावेळी मंडळ अधिकारी श्री. पी.एम. पिळणकर, कृषी पर्यवेक्षक श्री लांबोर, तलाठी श्री. प्रमोद वाले, कोतवाल श्री. विश्वनाथ नारकर, श्री. माने आदी उपस्थित होते. भुईबावडा पहिलीवाडी येथील वामन बाबाजी मोरे यांच्या भात शेतात महसूल विभागाचे सर्व अधिकारी भात कापणीसाठी उतरले होते. फोटो – भुईबावाडा येथे भात कापणी करताना तहसीलदार रामदास झळके, महसूल कर्मचारी व शेतकरी.

You cannot copy content of this page