सावंतवाडी ता.-:जागतिक सेवा दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने आज भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल , राणी जानकीबाई सुतिका गृह येथील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले आहे. यावेळी लायन्स अध्यक्ष अँड. परिमल नाईक व संस्था अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य पाटील, ला. झेड. सी. अशोक देसाई, ला. गजानन नाईक, ला. बाळ बोर्डेकर, ला. विद्याधर तावडे, ला.प्रसाद राऊत, ला. संदेश परब, ला. अरविंद पोकर, संदीप सुकी व कर्मचारी हजर होते.
लायन्स क्लब कडून सेवा दिनानिमित्त रुग्णालयात फळे वाटप
