सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 10 ऑक्टोबर रोजी

उपक्रमशील शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांना सन्मानपूर्वक करण्यात येणार पुरस्कार वितरण

*⚡कणकवली ता.०९-:* सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता कणकवलीत करण्यात येणार आहे. कणकवली तहसीलदार श्री. रमेश पवार, नरडवे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक मनोहर काजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदांत इमॅजिंग सेंटर , तेली आळी कणकवली येथे पुरस्कार वितरण होणार आहे.सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने 2021 सालचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कणकवली शाळा नं 3 मधील पदवीधर शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांना जाहीर करण्यात आला होता. राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधत या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. सतीश पवार यांनी केली होती. रोख रक्कम , सन्मानपत्र, शाल , श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

You cannot copy content of this page