*⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळ शुभारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. असे असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आमदार नितेश राणे यांनी अनोखे स्वागत केले आहे. देवगड तालुक्यातील पुरळ हुर्षी गावातील अनेक शिवसैनिकांनी भाजप प्रवेश केला आहे. कणकवली देवगड मतदार संघाचा विकास हा राणे आणि भाजपच करू शकतात. असा विश्वास व्यक्त करत शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, मागील काळात उद्धव ठाकरे यांना वेलेन्टाइन गिफ्ट दिल होत आज ते आपल्या जिल्ह्यात येत आहेत. अशा वेळी त्यांना आपले हे गिफ्ट ही आवडेल ज्या कार्यकर्त्यांनी भाजप वर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे त्यांना नक्कीच आपण विकासात्मक न्याय देऊ अशी ग्वाही यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिली. यावेळी देवगड उपसभापती रवींद्र तिरलोटकर, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, देवगड शक्ती केंद्रप्रमुख संदीप देवळेकर, बूथ प्रमुख संतोष पुजारे, नारायण तिरलोटकर, मंदार तिरलोटकर, प्रथमेश तिरलोटकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी महेश थोटम, विशाल देवळेकर, जितेंद्र थोटम, ओंकार थोटम, प्रशांत थोटम, अनिकेत भाटले, तेजस भाटले, पूजा भोटम, जान्हवी भोटम, मानसी भोटम, संतोष भोटम, दीपक देवळेकर, विकास मूळम, अरविंद तिरलोटकर, भालचंद्र आंबेरकर, राजेंद्र तिरलोटकर, साहिल मूळम, कृष्णा राणे, स्वप्नील शिंदे, सरिता देवळेकर आदी शिवसनिकांनी भाजपचा झेंडा हाती घेत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
देवगड तालुक्यातील अनेक शिवसैनिकांचा भाजप प्रवेश
