सिंधुदुर्ग एअरपोर्ट उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
*⚡सिंधुदुर्ग दि.०९-:* कोकण वासियांसाठी आजचा क्षण आनंदाचा असून, या विमानतळामुळे कोकणचा विकास होणार असून, चीपि विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण वासियांना दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, याच विमानतळावर हेलीपोर्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याला चालना मिळणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना हेलिकॉप्टर मधून कोकणचं सौंदर्य पाहता येईल असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी त्यांनी पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना म्हणाले की, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठी मातीशी असलेली नाळ जोपासत मराठी मध्ये भाषण केले. या मातीत अनेक झाडे उगवतात काही चांगली असतात काही बाभळीची असतात, परंतु, त्याला माती काही करू शकत नाही. त्या झाडाला देखील मातीला जोपासाव लागत अशा शब्दात नाव न घेता नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. कोकणचा कॅलिफोर्निया करण्यासाठी अनेक जण आले. अनेकांनी बोलून दाखवलं पण तळमळीने बोलण वेगळं आणि मळमळीण बोलण वेगळं असा टोला लगावला आहे. यावेळी विमानतळ पूर्ण करण्यासाठी एवढी वर्ष का लागली असा सवाल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना खोटं बोलणे आवडत नसल्यानेच त्यांनीं खोटे बोलणाऱ्याना पक्षातून बाहेर काढले होते. पेढ्यातला गोडवा आपल्या मनातून दाखवावा लागतो. आणि त्यामुळेच सिंधुदुर्गच्या जनतेने सलग दोनवेळा खासदार म्हणून विनायक राऊत यांना मोठ्या मताधिक्यानी निवडून दिलं. कोकणची जनता कधीच डोळे मिटून शांत राहत नाही असा इशारा देखील त्यानी या चिपि विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावरून दिला आहे.
