चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळयाचे कणकवलीत याची देही याची डोळा दर्शन

ढोल-ताशांच्या गजरात शिवसेनेने आनंदोत्सव केला साजरा

*⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसेनेच्यावतीने कणकवली शहरातील आप्पासाहेब पर्टवर्धन चौकात स्क्रीन लावून या ऐतिहासिक सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले होते. हे प्रेक्षपण नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावून पाहिले.या सोहळ्यानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तर अनेकांनी हा ऑनलाइन सोहळा पाहून या क्षणाचा आनंद घेतला. चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यमंत्री मंडळातील मंत्री व स्थानिक आमदार यावेळी उपस्थित होते. हा ऐतिहासिक सोहळा नागरिकांना पाहता यावा यासाठी कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने कणकवली येथील आप्पासाहेब पर्टवर्धन चौकात भव्य दिव्य स्क्रीन लावून या सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण दाखविले. या सोहळ्याच्यापूर्वी सिंधुदुर्ग गर्जना ढोल पथकाने ढोल-ताशांचा गजर करीत परिसर दणाणून सोडला.तसेच उद्धाटन होताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page