आता चौके नेरूरपार रस्त्यावर सुद्धा बॅनरबाजीतून खड्ड्यांवर शेरेबाजी
बॅनर ठरत आहेत लक्षवेधी मालवण (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी तारकर्ली देवबाग या रस्त्यावर तसेच कांदळगाव मसुरे या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांबाबत अज्ञातांनी बॅनरबाजी केल्यानंतर आता याच बॅनरबाजीचे लोण चौके नेरूरपार कुडाळ या रस्त्यावर जागोजागी आढळून येत आहे या बॅनरबाजीत स्थानिक लोकप्रतिनिधी वर अप्रत्यक्षपणे टीका टिपण्णी करण्यात आली आहे यात एका बॅनरवर तर “पहिलं वैभव कणकवलीत होतं आता…
