नगराध्यध्यक्ष संजू परब;भेट देत मागण्या घेतल्या जाणून
*⚡सावंतवाडी ता.०८-:* शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सावंतवाडीत सुरू आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी परब यांनी एसटी कर्मऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन चर्चा केली. ते म्हणाले, एवढ्या कमी पगारात महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी काम करतात. त्याला दाद दिली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी 2015 सालापासून आहे. मात्र, अद्यापही ती मान्य झाली नाही हे दुर्दैव आहे. त्यांची मागणी मान्य झालीच पाहिजे. अनिल परब यांचे मी स्टेटमेंट वाचले होते. सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर गप्प बसणार नाही. नगराध्यक्ष म्हणून याचा निषेध करतो, असे सांगितले.
