एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केले तीव्र आंदोलन

एसटी फेऱ्या केल्या बंद

मालवण दि प्रतिनिधी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेले एसटी कर्मचारी यांचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र बनले. आगारातून सुटणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या असून चालक, वाहक यासह सर्व एसटी कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. मालवण आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या मध्यरात्री पासून बंद आहेत. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे कर्मचारी यांनी सांगितले. सर्व मार्गावर एसटी सेवा बंद असल्याने प्रवासी वर्गाला फटका बसत आहे. मात्र काही प्रवासी वर्गातून एसटी कर्मचारी यांची मागणी योग्य असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे.

You cannot copy content of this page