Headlines

आंबोली महादेवगड पॉईंटवरून पर्यटक ४०० फूट दरीत कोसळला…

सावंतवाडी : आंबोली महादेव गड पॉईंट येथून पर्यटक दरीत कोसळला. आज सायंकाळी साडेपाच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 400 फुट खोल दरीत पर्यटक कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्कयू टीम आंबोली-सांगेलीकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, संबंधित पर्यटक खोल दरीत कोसळल्याने व पाऊस अन् काळोख झाल्याने ही मोहीम उद्या सकाळी ६ वा. सुरू करण्यात येणार आहे. आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page