नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांच्याकडून वचनपूर्ती..
⚡मालवण ता.०४-:
मालवण शहरातील चिवला बीच, हिंदळेकरवाडी येथे विजेची समस्या जाणवत असल्याने तेथे नवीन वीज ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नागरिकांना दिलेले आश्वासन नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले आहे. हिंदळेकर वाडा महापुरुष मंदिर येथे १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. वराडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
हिंदळेकरवाडा येथे दरवर्षी पावसाळ्यात व्होल्टेजची समस्या उद्भवत होती. त्यामुळे तेथील विद्युत प्रवाह खंडित व्हायचा. ही समस्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी तेथील ग्रामस्थांनी सौ. ममता वराडकर यांच्या समोर मांडली होती. त्यावेळी या समस्येवर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन सौ. वराडकर यांनी दिले होते. हे आश्वासन सौ. वराडकर यांनी आज पूर्ण केले असून हिंदळेकरवाडा येथे १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ तेथील महापुरुष देवास गाऱ्हाणे घालून व श्रीफळ वाढवून करण्यात आला. दरम्यान, ट्रान्सफॉर्मर साठी आवश्यक जागेसाठी व जागा सफाईसाठी स्थानिक नागरिकांचेही सहकार्य लाभले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, मनमोहन वराडकर, भाई कासवकर, आबा शिर्सेकर, शिवाजी केळुसकर, मनोज मयेकर, प्रदीप मयेकर, रूजाय फर्नांडिस, संतोष सावंत, संतोष परब, शैलेश चिंदरकर, गणेश चिंदरकर, हर्षल मयेकर, महेश मयेकर, राज कांदळगावकर, सुधीर कांदळकर, हर्षद सावंत, रतन मयेकर, मनोज शिरोडकर, विजय केळुसकर, अर्षद खटखटे, राहुल कीर, प्रफुल्ल मयेकर, शशांक कुबल, सुशांत करंगुटकर आदी उपस्थित होते.
