बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलीस ठाण्यातील श्री देव पाटेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त सकाळी १० वाजता लघुरुद्र, दुपारी १ वाजता आरती, तर दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होणार असून परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदा पोलीस ठाण्यातील श्री देव पाटेश्वर मंदिराचा वर्धापन दिन ६ ऑगस्टला
