नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे केले कौतुक; एक महिन्यात पुतळा विषय निकाली काढणार
*⚡कणकवली ता.०८-:* छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराच्या विषयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वपक्षीय एकत्र येतात ही खरोखरच जिल्ह्याच्या दृष्टीने शुभसंकेत देणारी बाब आहे.शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरीत केला पाहिजे यासाठी जे काही करायचे आहे ते आपण करु ,सर्वांच्या मताने करण्यात येईल. मात्र ती जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित होणे आवश्यक आहे. पुतळ्याचे काम हे कायमस्वरूपी करायचे आहे त्यामुळे तुमच्या भावनांचा आदर केला जाईल,फक्त मला एक महिन्याची मुदत द्या,जीव ओतून काम केलं जाईल. जिल्हा नियोजनमधून लागेल तेवढा निधी दिला जाईल.जे. जे.स्कुल ऑफ आर्ट कणकवलीच्या पुतळ्याचे काम करेल.हे करताना कायदेशीर बाबी तपासणी करुन काम केले जाईल ,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल.येत्या आठही दिवसात निर्णय घेतला जाईलअसे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. कणकवली नगरपंचायत भालचंद्र महाराज सभागृहात लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना प्रतिनिधी, कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक, मराठा समाज प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे.या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, आ.नितेश राणे, आ.वैभव नाईक,माजी आ.परशुराम उपरकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुशांत नाईक,जिल्हा प्रशासन अधिकारी जयंत जावडेकर,अबिद नाईक,प्रभारी तहसीलदार प्रिया परब,डॉ.विद्याधर तायेशेट्ये,अशोक करबळेकर,व्यापारी संघटना अध्यक्ष दीपक बेलवलकर, सुशील सावंत,अण्णा कोदे, ज्ञानेश्वर दिपनाईक, समीर सावंत,महेश सावंत,सुशील सावंत,बबलू सावंत,भाई परब,आनंद पारकर,गटनेते संजय कामतेकर,नगरसेवक अभिजित मुसळे,कन्हैया पारकर,विराज भोसले,महेश तेली,किशोर राणे,मनोज हिर्लेकर,प्रितम म्हापसेकर,अनंत पारकर,राजेंद्र पेडणेकर,शैलश भोगले, राजु राठोड,रिमेश चव्हाण, अजय गांगण,संतोष सावंत,शेखर राणे, निनाद दीपनाईक प्रकाश नेरुरकर, अनिल हळदिवे,मिलींद मेस्त्री आदींसह नागरिक उपस्थित आहेत.नगराध्यक्ष समीर नलावडे व नगरपंचायत पदाधिकारी यांनी सर्वांचे स्वागत केले आहे.नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी प्रस्तावना करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य जागी स्थलांतरीत हवा ही आमची भूमिका आहे तीन वर्षापूर्वी पुतळा स्थलांतराचा विषय घेतला होता परंतु काही अडथळे आले आता कोणत्याही स्थितीत सर्वांना विश्वासात घेऊन हा पुतळा स्थलांतरित होणे आवश्यक आहे पक्षीय मतभेद बाजूला ठेवत आपण एकत्र आलो आहोत अशाच प्रकारे छत्रपतींच्या पुतळ्याची साठी सुयोग्य मार्ग काढावा यामध्ये कोणत्याही प्रकारचा श्रेयवाद असणार नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री ना. उदय सामंत पुढे म्हणाले,जागा कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायत मालकी करावी लागेल,दोन्ही जागा मागणी करावी.आजच्या आज बैठक मिनिट्स जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून द्या. कायदेशीर बाबी तपासणी करुन केले जाईल ,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.एवढ्या सर्व लोकांना एकाच वेळी व्यासपीठावर पाण्याची कल्पकता लागते आणि ती कल्पकता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामध्ये आहे.माझी ४ टर्म झाली आहे,मला ही कला सापडली नाही,अशा शब्दांत नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे कौतुक ना.उदय सामंत यांनी केले. जनतेचा प्रश्नांसाठी एकत्र येणे, हे हिताचे आहे-आ.नितेश राणे कणकवली शहरातील नागरिकांनी व्यक्त केलेल्या मताला प्राधान्य दिले पाहिजे.हा माझा आग्रह आहे.सकल मराठा समाजाचे मंडळ जागृत आहे,त्यांनी जी जागा सुचवली आहे.तांत्रिक दृष्टीने विचार केला पाहिजे. गेली तीन वर्षे आम्हीही कमी पडलो, शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर तुम्ही जो निर्णय दिला,तो घेतला पाहिजे,त्या जागी भव्य स्मारक करायचे असेल त्या ठिकाणी आमदार म्हणून मी पाठपुरावा करेन.जनतेचा प्रश्नांसाठी एकत्र येणे,हे हिताचे आहे,असे मत आ.नितेश राणे यांनी व्यक्त केले.कणकवली शहराच्या इतिहासात अशी बैठक नोंद करणारी आहे.जनतेमध्ये विश्वास निर्माण होईल.पालकमंत्री व सर्वजण मिळून एकत्र निर्णय घेण्यात येईल,असे नितेश राणे यांनी सांगितले.400 वर्षांनंतरही छत्रपतींसाठी आपण एकजुट दाखवतो हा शुभसंकेत आहे. तूर्तास सर्वंकष विचार करून दीपनाईक यांच्या जागेसह लगतच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावा. त्यानंतर राज्य शासनाच्या 23 गुंठे जागेत भव्यदिव्य स्वरूपात पुतळा स्थापन करावा, अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी केली. याबाबत आजच्या बैठकीत त्वरित निर्णय घेऊया. येत्या 23 फेब्रुवारी, 2022 रोजी धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करूया, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले. छत्रपतींचा पुतळा स्थलांतरचा
