एसटी कर्मचारी संपाला भाजपचा पाठिंबा

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची माहिती

मालवन दि प्रतिनिधी विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला मालवण तालुका भाजपने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाल्यास भाजप कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहील, असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले. अनियमित असणारे पगार व कुठल्याही संरक्षणाची हमी नाही, अशा कर्मचाऱ्यांच्या मानसिक परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या मागण्या महाविकास आघाडी सरकार मान्य करत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन हे बरोबर असून या मागण्या मान्य होणे आवश्यक आहे. ज्यावेळी संप सुरू झाला व काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा संप मिटला असे सांगून कर्मचाऱ्यांमध्ये फुट पाडून संप मोडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे, असे धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी भाजपाने आधीच मागणी केलेली आहे. आश्वासन देऊन फक्त कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवून न्यायालयाचा अपमान करून आपण संप करत आहात असे सांगून दडपशाही करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे चुकीचे आहे, असेही चिंदरकर यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, नगरसेवक सुदेश आचरेकर ,दीपक पाटकर ,गणेश कुशे ,महेश मांजरेकर बाबा परब, प्रमोद करलकर, आप्पा लुडबे, पंकज पेडणेकर, संतोष गावकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page