Headlines

जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 14 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

इंधन कर कपात करा अन्यथा भाजप आंदोलन छेडणार

सरकार विरोधात कणकवली भाजपाचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन *⚡कणकवली ता.११-:* केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल व डिझेल वरील कर कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा भारतीय जनता पार्टीला या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागले. असा इशारा देत कणकवली तालुका भाजपच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन देत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष…

Read More

पेट्रोल, डिझेल दरात तात्काळ कपात करा

भाजपची राज्य सरकारकडे मागणी;अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा *⚡सावंतवाडी ता.११-:* केंद्र सरकारने पेट्रोल वर ७ रुपये तर डिझेलवर १० रुपये कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. परंतु, महा विकास आघाडी सरकारने कोणत्याही प्रकारे या इंधनाच्या दरात कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला नाही. याचा निषेध आज भाजप सावंतवाडी शहर मंडल कडून व्यक्त करण्यात…

Read More

प्रतिभा डेअरीकडून थकित असलेले 2 कोटी 65 लाख रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?

माजी आम. उपरकर यांचा सवाल;निवडणूक तोंडावर आल्यावर आली जाग *⚡कणकवली ता.११-:* जिल्हा बँक निवडणूक तोंडावर आल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष व दूध संघाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांची आठवण झाली हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी आता आयोजित केलेली संयुक्त बैठक गेल्या चार वर्षात…

Read More

काकड आरतीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡वेंगुर्ला ता.११-:* कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला प्रारंभ झाला असून पहाटेच्यावेळी होणा-या या आरतीने वातावरण भक्तिमय होत आहे. आश्विन पौर्णिमेपासून जिल्ह्यातील काही ग्रामदेवतेच्या मंदिरात तसेच ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार ही काकड आरती केली जात आहे. वेंगुर्ला येथे भुजनागवाडी, माणिकचौक व दाभोसवाडा या विठ्ठल मंदिरांमध्ये काकड आरती सुरु आहे. पहाटेला…

Read More

किल्ले स्पर्धेत बालगणेश मित्रमंडळ भटवाडी प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.११-:* दीपावलीचे औचित्य साधून वेंगुर्ला शिवसेना आयोजित सचिन वालावलकर पुरस्कृत वेंगुर्ला शहर मर्यादित किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत बाल गणेश मित्र मंडळ भटवाडीने प्रथम क्रमांक पटकाविला. लहान मुलांमध्ये गड किल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी, त्यांना इतिहासाचा अभ्यास करता यावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये चिन्मय मराठे-मधली भटवाडी यांनी द्वितीय क्रमांक, सप्तरंगी…

Read More

तुळशी वृंदावने नटू लागली

निमित्त विवाहाचे:सोमवार पासून तुळशी विवाह सुरू कुडाळ ता.११ संदीप चव्हाण-:* दिवाळीनंतर तुळशी विवाहाचे वेध लागले आहेत सोमवार दिनांक १५नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत असून १९ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती असल्याने अंगणात लक्ष वेधून घेणारे तुळशी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी सुरू झाली आहे. भारतीय संस्कृती ही मुळातच भावात्मकता प्रधान आहे. त्यामुळे तुळशीला हिंदू संस्कृतीत कन्येचे स्थान…

Read More

माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

अन्य दोघे सुखरूप;उद्या शोधमोहीम सुरू : शंकर कोरे* सावंतवाडी,ता.१० : येथील माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी १८ वर्षीय युवक बुडाला आहे. तर त्याचे अन्य दोघे साथीदार सुखरूप आहेत. हा प्रकार आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान सायंकाळ असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे उद्या…

Read More

अनधिकृत वॉटरस्पोर्ट्स विरोधात बंदर विभागाची धडक कारवाई

आठ व्यावसायिकांवर पोलिसांत गुन्हा दाखल मालवण (प्रतिनिधी) दिवाळीच्या निमित्ताने सध्या मालवणातील पर्यटन व्यवसाय जोमात असतानाच बंदर विभागाने अनधिकृतपणे वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मालवण समुद्रात अनधिकृत रित्या साहसी जल क्रीडा व्यवसाय करणाऱ्या मालवणातील सात ते आठ पर्यटन व्यावसायिकांवर बंदर निरीक्षक सौ. सुषमा कुमठेकर यांच्या तक्रारीवरून मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा खास. सुरेश प्रभू यांच्यातर्फे सत्कार

*⚡मालवण ता.१०-:* सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि ठाकर आदिवासी कलांचे जतन करणाऱ्या परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल गंगावणे यांचा दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत असलेल्या परशुराम गंगावणे यांनी पिंगुळी गुढीपुर येथे आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चर्मवाद्ये या काही शतकांची परंपरा…

Read More
You cannot copy content of this page