*⚡वेंगुर्ला ता.११-:* दीपावलीचे औचित्य साधून वेंगुर्ला शिवसेना आयोजित सचिन वालावलकर पुरस्कृत वेंगुर्ला शहर मर्यादित किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत बाल गणेश मित्र मंडळ भटवाडीने प्रथम क्रमांक पटकाविला. लहान मुलांमध्ये गड किल्ल्यांविषयी जनजागृती व्हावी, त्यांना इतिहासाचा अभ्यास करता यावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेमध्ये चिन्मय मराठे-मधली भटवाडी यांनी द्वितीय क्रमांक, सप्तरंगी ग्रुप भटवाडी यांनी तृतीय क्रमांक आणि जय महाराष्ट्र गावडेवाडी यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले आहे. स्पर्धेचे परीक्षण जे जे आर्ट स्कूलचे निवृत्त प्राध्यापक सुनील नांदोसकर, खर्डेकर महाविद्यालयाचे संजय पाटील यांनी केले. स्पर्धेचे बक्षिस वितरण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संफप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, बाळा दळवी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, दिलीप राणे, गजानन गोलतकर, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.
किल्ले स्पर्धेत बालगणेश मित्रमंडळ भटवाडी प्रथम
