Headlines

पूजा राणे ठरली मिस दीपावली २०२१

आरोस दांडेली जय हनुमान मित्रमंडळाचे आयोजन *⚡सावंतवाडी ता.१२-:* आरोस दांडेली येथील सौंदर्य स्पर्धेत पुजा राणे हिने मिस दीपावली 2021 मुकुट पटकावला.आरोस दांडेली येथील जय हनुमान मित्र मंडळाकडून दिवाळी निमित्त दिपावली शो टाईम 2021 ह्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या मिस दीपावली या सौंदर्य स्पर्धेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या…

Read More

अखेर तो मृतदेह सापडला…

*⚡सावंतवाडी ता.१२-:* दोन दिवसांपूर्वी माडखोल धरणात बुडालेल्या अर्जुन पाताडे या युवकाचा मृतदेह आज सकाळी धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसून आला असून, याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात तो मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read More

तुका म्हणे आता नाटकाचा 13 रोजी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते शुभारंभ

तब्बल दोन वर्षांनंतर रंगभूमीवरचा पडदा उघडणार *⚡कणकवली ता.११-:* पु ल देशपांडे लिखित रघुनाथ कदम दिग्दर्शित व स्वाती राजेंद्र कदम निर्मित तुका म्हणे आता ही नाट्य कृती लवकरच नाट्य रसिकांच्या भेटीला येत आहे. गेली अनेक वर्षे नाट्य क्षेत्रात अनेक नावीन्य पूर्ण कलाकृती सादर करणाऱ्या वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांच्यावतीने १३ नोव्हेंबर रोजी तुका म्हणे आता या…

Read More

बेकायदेशीर पर्ससीन, एलईडी व हायस्पीड मासेमारीला बिलकुल थारा दिला जाणार नाही

प्रादेशिक मत्स्य उपायुक्त महेश देवरे *⚡मालवण ता.११-:* बेकायदेशीर पर्ससीन व एलईडी मासेमारीवर मत्स्य विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याबाबत मालवणातील मच्छीमार प्रतिनिधींनी मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक मत्स्य विकास विभागाचे उपायुक्त महेश देवरे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. हजारो रुपये खर्च करून मत्स्य व्यवसाय विभागाने भाड्याने घेतलेली गस्ती म्हणजे भीती दाखविण्यापुरतं बुजगावणं नाही….

Read More

माडखोल धरणांतील बेपत्ता युवकाचा अद्याप शोध नाही

बाबल आल्मेडा टीमला अपयश;उद्या पुन्हा राबविणार शोधमोहीम *⚡सावंतवाडी ता.११-:* माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता झाल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली होती. अर्जुन पाताडे ( वय १८, न्यू खासकीलवाडा) असे त्या युवकाचे नाव असून, तेजस राऊळ (वय १८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून माडखोल…

Read More

मेडिकल कॉलेज घाईगडबडीत सुरू केल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

परशुराम उपरकर:मनसे शिष्टमंडळाने घेतली डीन डॉ मोरे यांची भेट *⚡ओरोस ता.११-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ मोरे यांची भेट घेत कॉलेज सुरू होण्यासंबंधी सर्व बाबींचा सखोल पणे आढावा घेतला. यावेळी मनसेने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ मोरे यांच्याकडून समर्पक व…

Read More

खाजगी वाहतूकदारांचा एसटी संपाला पाठिंबा

तरीही खाजगी वाहतूकदार विरोधात गेल्यास मनसे रस्त्यावर उतरेल;परशुराम उपरकर यांचा इशारा *⚡मालवण ता.११-:* आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहतूकदारांना बसस्थानकांवरून सेवा देण्यास परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यात खाजगी वाहतूकदारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. परंतु, भविष्यात कोणाही खाजगी वाहतूकदाराने…

Read More

मालवणात पोलिसांकडून वाहनांची तपासणी

*⚡मालवण ता.११-:* मालवण शहरात सध्या पर्यटकांचा ओघ जास्त असून या पार्श्वभूमीवर काल रात्री मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे मालवण पोलिसांनी अचानकपणे नाकाबंदी मोहीम राबवत पर्यटकांच्या वाहनांसह सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर…

Read More

डोंबिवली येथे १४ रोजी रक्तदान शिबिर

*⚡मालवण ता.११-:* थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्ण, डायलेसिस, हिमोफेलिया, सिकलसेल, गर्भवती माता, अपघात ग्रस्त रुग्ण यांना नियमित लागणारा रक्तपुरवठा आणि फास्टफूड जीवनशैली मुळे अपुरा रक्ताचा सर्वत्र होणारा तुटवडा लक्षात घेता डोंबिवली शहरात रक्ताची कमी भरून काढण्यासाठी ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था(रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लडबँक शास्त्रीनगर हॉस्पिटल, दुसरा माळा, कोपर…

Read More

नगरपरिषदेतर्फे महिला व मुलींसाठी विविध प्रशिक्षणे

*⚡वेंगुर्ला ता.११-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण व स्वास्थ्य समितीच्यावतीने नगरपरिषद हद्दीतील महिला व मुली यांच्यासाठी अकाऊंटींग, टॅली जीएसटी, बँकिग फायनान्स इन्शुरन्स, ग्राफिक्स डिझाईन, वेड डिझाईन व इंग्लिश स्पिकींग अशी पाच प्रशिक्षणे आयोजित करावयाची आहेत. तरी ज्या लाभार्थींना प्रशिक्षणात सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत नगरपरिषद कार्यालयात नावनोंदणी करावयाची आहे. तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी याचा लाभ घ्यावा…

Read More
You cannot copy content of this page