*⚡मालवण ता.११-:* थॅलेसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्ण, डायलेसिस, हिमोफेलिया, सिकलसेल, गर्भवती माता, अपघात ग्रस्त रुग्ण यांना नियमित लागणारा रक्तपुरवठा आणि फास्टफूड जीवनशैली मुळे अपुरा रक्ताचा सर्वत्र होणारा तुटवडा लक्षात घेता डोंबिवली शहरात रक्ताची कमी भरून काढण्यासाठी ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था(रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लडबँक शास्त्रीनगर हॉस्पिटल, दुसरा माळा, कोपर रोड, वाशी बस स्थानक जवळ डोंबिवली पश्चिम येथे रविवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागिरीकांनी रक्तदान हे आपले कर्तव्य समजून या जीवनदायी उपक्रमात सहभाग घेऊन रक्तदान करावे, रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहिती साठी सिद्धेश मांडवकर 77769 23444, सचिन आचरेकर 97021 24913, विजय पांचाळ 8082461263 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डोंबिवली येथे १४ रोजी रक्तदान शिबिर
