मालवणात पोलिसांकडून वाहनांची तपासणी

*⚡मालवण ता.११-:* मालवण शहरात सध्या पर्यटकांचा ओघ जास्त असून या पार्श्वभूमीवर काल रात्री मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे मालवण पोलिसांनी अचानकपणे नाकाबंदी मोहीम राबवत पर्यटकांच्या वाहनांसह सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही तपासणी मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती मालवण पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page