नगरपरिषदेतर्फे महिला व मुलींसाठी विविध प्रशिक्षणे

*⚡वेंगुर्ला ता.११-:* वेंगुर्ला नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण व स्वास्थ्य समितीच्यावतीने नगरपरिषद हद्दीतील महिला व मुली यांच्यासाठी अकाऊंटींग, टॅली जीएसटी, बँकिग फायनान्स इन्शुरन्स, ग्राफिक्स डिझाईन, वेड डिझाईन व इंग्लिश स्पिकींग अशी पाच प्रशिक्षणे आयोजित करावयाची आहेत. तरी ज्या लाभार्थींना प्रशिक्षणात सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत नगरपरिषद कार्यालयात नावनोंदणी करावयाची आहे. तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला बालकल्याण स्वास्थ्य समितीच्या सभापती शितल आंगचेकर व समिती सदस्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page