मेडिकल कॉलेज घाईगडबडीत सुरू केल्या विद्यार्थ्यांचे नुकसान

परशुराम उपरकर:मनसे शिष्टमंडळाने घेतली डीन डॉ मोरे यांची भेट

*⚡ओरोस ता.११-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ मोरे यांची भेट घेत कॉलेज सुरू होण्यासंबंधी सर्व बाबींचा सखोल पणे आढावा घेतला. यावेळी मनसेने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ मोरे यांच्याकडून समर्पक व आश्वासक उत्तरे मिळाली नाहीत. यावर आपल्या अधिकार क्षेत्रात सदरच्या गोष्टी बसत नसल्याने वरिष्ठांशी बोलून माहिती घेऊन कळवतो असे आश्वासन डॉक्टर मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. मूळात रुग्णालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, इमारती, यंत्रसामुग्री, तज्ञ डॉक्टर, प्रयोगशाळा, कर्मचारी वर्ग आदी घटकांचा भरणा केल्याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री चालू वर्षी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे खोटे आश्‍वासन जिल्हावासीयांना देत आहेत ही खरी वस्तुस्थिती आहे. 500 बेड,दररोज ओपीडी,ऑपरेशन थिएटर, तज्ञ डॉक्टर त्यांना आवश्यक सुविधा आदी गोष्टींच्या कमतरतेमुळे जिल्हा बाहेरील तज्ञ वैद्यकीय डॉक्टर अधिकारी जिल्ह्यात येण्यास इच्छुक नाहीत.मात्र पालकमंत्री व खासदार मेडिकल कॉलेज चालू झाल्याचे सांगत रेटून नेत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून जिल्हा रुग्णालयात जनतेसाठी आरोग्य सुविधांची गैरसोय होत आहे.रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना तीन तीन महिने पगार दिले गेले नाहीत.एकूणच भोंगळ कार्यपध्दती राबविली जात असून पायाभूत सुविधा तज्ञ अधिकारी व कर्मचारी, यंत्रसामुग्री यांचा भरणा झाल्याशिवाय घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये अशी सूचना मनसे शिष्टमंडळाने केली. यावेळी कुडाळ प्रसाद गावडे, अणाव सरपंच आप्पा मांजरेकर,अमोल जंगले, संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page