माडखोल धरणांतील बेपत्ता युवकाचा अद्याप शोध नाही

बाबल आल्मेडा टीमला अपयश;उद्या पुन्हा राबविणार शोधमोहीम

*⚡सावंतवाडी ता.११-:* माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला युवक बेपत्ता झाल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली होती. अर्जुन पाताडे ( वय १८, न्यू खासकीलवाडा) असे त्या युवकाचे नाव असून, तेजस राऊळ (वय १८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सावंतवाडी पोलिस स्थानकात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून माडखोल धरणात बाबल आल्मेडा टीमकडून त्या युवकाचा शोध घेण्यात आला. परंतु, सायंकाळपर्यंत त्यांना त्यात यश आले नव्हते. आता पुन्हा एकदा उद्या सकाळी ९ वाजल्यापासून रेस्क्यू टीमच्या सहाय्याने त्या युवकांचा शोध घेत खात्री करणार आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांनी दिली आहे.

You cannot copy content of this page