अन्य दोघे सुखरूप;उद्या शोधमोहीम सुरू : शंकर कोरे*
सावंतवाडी,ता.१० : येथील माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी १८ वर्षीय युवक बुडाला आहे. तर त्याचे अन्य दोघे साथीदार सुखरूप आहेत. हा प्रकार आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान सायंकाळ असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे उद्या त्याचा शोध घेण्यात येणार आहे, असे कोरे यांनी सांगितले.
