पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा खास. सुरेश प्रभू यांच्यातर्फे सत्कार

*⚡मालवण ता.१०-:* सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि ठाकर आदिवासी कलांचे जतन करणाऱ्या परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल गंगावणे यांचा दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंत असलेल्या परशुराम गंगावणे यांनी पिंगुळी गुढीपुर येथे आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चर्मवाद्ये या काही शतकांची परंपरा असलेल्या कला जतन करण्यासाठी संघर्षमय योगदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी गंगावणे यांचा दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी सत्कार केला. यावेळी केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page