पालकमंत्र्यांच्या विरोधात 24 ला मनसेची निषेध यात्रा

परशुराम उपरकर यांची माहिती;जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

*⚡कुडाळ ता.१०-:* जनतेची फसवणूक करणारे कुडाळ-मालवणचे आमदार, खासदार, आणि पालकमंत्री यांच्या विरोधात २४ नोव्हेंबर रोजी कुडाळ बाजारपेठेतून ढोल-ताशांच्या गजरात निषेध यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सर्वसामान्यांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. पालकमंत्र्यांनी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी ७ कोटी निधी देण्याबाबत केलेली घोषणा हवेतच विरली, अशी टीकाही त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी ते पुढे म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ येथे सर्व रस्ते खड्डे मुक्त करू असे आश्वासन दिले होते मात्र दसरा झाला दिवाळी झाली तरीही खड्डे तसेच जनतेच्या सर्व लक्षात आणून देण्यासाठी आम्ही कुडाळ बाजारपेठेतून त्यांनी फसवणुकीचा पोल-खोल यात्रे द्वारे करणार आहोत. सत्ताधार्यां नाच आपल्या कामांवर विश्वास नसल्यानेच आता पालकमंत्री सेल लावल्यासारखे जणू काही आपल्या खिशातूनच निधी देतो. अशाप्रकारे वागत आहेत. सरपंच आला तर १० लाख, पंचायत समिती सदस्य आला तर २५ लाख आणि जिल्हा परिषद सदस्य आला तर ५० लाख निधीचे वाटप करणार असे सांगतात. अशा प्रकारे जनतेची फसवणूक करत आहेत. महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत. अनेक डॉक्टर्स राजीनामे देत आहेत. हे अपयश सरकारचे व येथील सत्ताधारी जनतेचे आहे. आज एसटी कामगारांचा संप आहे त्याठिकाणी जाण्यास यांना वेळच नाही. अपवाद फक्त दीपक केसरकर. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आठ नऊ महिने झालीच नाही. दर तीन महिन्यांनी हि बैठक होते आवश्यक आहे. आज हे नियोजन करण्यासाठी आवश्यक कर्मचारी नाही मग निधी खर्च होणार कसा. असं सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेनेचे कुणाल किनळेकर, बाळा पावसकर, आपा मांजरेकर, बाबल गावडे, दिपक गावडे, गुरू मर्गज, हितेंद्र काळसेकर, रामा सावंत, सुंदर गावडे,सचिन सावंत, रमा नाईक, सचिन ठाकूर, सत्यविजय कवीटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page