६८ वस्त्यांनी जातीवाचक नावे बदलली
समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता २५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जातीवाचक नावे असलेल्या वस्त्यांची नावे बदलण्याची काम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत ६८ वस्त्यांची नावे बदलण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही अनेक मागास वत्यांना व रस्त्यांना जातीचा उल्लेख असलेली नावे आहेत. पूर्वीपासून या वस्त्यांना विशिष्ट जातीवरून…
