*⚡सावंतवाडी ता.२५-:* शिवाजी भोसले एज्युवर्ल्ड कोल्हापूर आयोजित, राज्यस्तरीय बोधकथा कथन स्पर्धेत, केंद्र शाळा बांदा नंबर एकचा, इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला . त्याच्या या यशात बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका नाईक मॅडम, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर त्याचबरोबर त्याचे आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर आणि नीलचे मामा प्रसिद्ध चाईल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर उमेश उत्तम सावंत यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे .नील ने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केलेले आहे . विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत नील बांदेकर प्रथम
