२६/११ हल्ल्यातील शहिदांना उद्या सावंतवाडीत वाहणार श्रद्धांजली…

निशांत तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* दहा वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद होऊन वीरमरण पत्करलेल्या महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी केशवसुत कट्टा येथे उद्या साय 7 वा निशांत तोरसकर मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिक तसेच युवा वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे या कार्यक्रमाला सावंतवाडी पोलीस ठाण्याचे मुख्य निरीक्षक श्री कोरे साहेब, सावंतवाडी तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे साहेब, सावंतवाडीचे प्रथम नागरिक श्री संजू परब तसेच शहरातील सर्व नगरसेवक व इतर अनेक प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक,पत्रकार मित्र उपस्थित राहणार आहेत

You cannot copy content of this page