*⚡वेंगुर्ला ता.२५-:* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अणसूर-पाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून मुख्य रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून श्रमदान केले. पाल केंद्रस्तरावर विविध स्पर्धांमध्ये खालीलप्रमाणे प्रथम तीन क्रमांकांमध्ये प्राविण्य संपादन केले. रांगोळी स्पर्धा – चरित्रा राऊळ (दहावी), काजल गावडे (दहावी), शिवांगी अणसूरकर (नववी), निबंध स्पर्धा-यशश्री केरकर (दहावी), श्रेया आरोसकर (दहावी), सायली गावडे (दहावी), वक्तृत्व स्पर्धा-काजल गावडे (दहावी), साक्षी गावडे (दहावी), वैष्णवी गावडे (नववी), चित्रकला स्पर्धा-सानिया पालकर (नववी), यश सावंत (दहावी), हर्षला पालकर (आठवी). सर्व यशस्वी स्पर्धकांचे संस्था अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
पाल केंद्रस्तरावरील विविध स्पर्धांचा निकाल जाहीर
