नगराध्यक्ष संजू परब यांच्या वक्तव्याने तेली समाजाच्या भावना दुखावल्या

*⚡कणकवली ता.२५-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून बोलताना कहा राजा भोज कहा गंगू तेली…असा उल्लेख केला आहे. संजू परब यांनी केलेल्या उल्लेखाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सिंधुदुर्ग तेली समाजाच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांचा निषेध करत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली यांनी केली. संजू परब यांनी दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा आगामी निवडणुकीत परिणाम दिसतील असा इशारा यावेळी देण्यात आला कणकवली येथे पत्रकार परिषदेत घेत सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाने आपली बाजू मांडली यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली, सचिव चंद्रकांत तेली, खजिनदार परशुराम झगडे, माजी जिल्हाध्यक्ष आबा तेली, कार्यकारिणी सदस्य शैलेश डीचोलकर , कणकवली तालुका अध्यक्ष प्रकाश काळसेकर कणकवली उपाध्यक्ष विशाल नेरकर ,कणकवली सचिव दत्ताराम हिंदळेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य साई आंबेरकर उपस्थित होते. जिल्हा सचिव चंद्रकांत तेली यांनी गंगू तेली ही व्यक्ती इतिहासात नव्हती. राजा गांगेय नरेश आणि चालुक्य तैलेय हे दोघे मिळून भोज राजाशी लढले. त्याची तुलना करताना अपभ्रांश झाला. ते गद्दार नव्हते. त्यामुळे राजकीय वक्तव्य करताना जातीचा उल्लेख करून आमच्या भावना दुखावू नयेत. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली म्हणाले, राजकारण तुम्ही जरूर करा परंतु त्यात जात आणू नका सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी तेली समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे याचा तेली समाज म्हणून आम्ही निषेध करत आहोत तुम्ही टीका करा परंतु तु कोणत्या जातीला याठिकाणी सोडू नका टीका करताना भान ठेवा ज्या ज्या पक्षात संजू परब काम करत आहेत त्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे आहेत हे लक्षात ठेवा हे बोलताना तारतम्य बाळगा तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर आमच्यासमोर या आम्ही इतिहास दाखवून देतो असे लक्ष्मण तेली म्हणाले. खजिनदार परशुराम झगडे यांनी सांगितले की,आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, संजू परब यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही तर त्याचा फटका निवडणुकीत बसेल असा इशारा दिला. शैलेंद्र डीचोलकर यांनीही संजू परब यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. संजू परब यांनी तेली समाजाचे माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा जिल्हाभरात उद्रेक होईल असे शैलेंद्र डीचोलकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांचा केला निषेध

You cannot copy content of this page