पीएमजीएसवायची ६४ कामेच पूर्ण

१७२ कामे आहेत मंजूर:स्थायी समिती सभेतील माहिती

सिंधुदुर्गनगरी ता २५ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१९-२० या पाच वर्षात मंजूर झालेल्या १७२ कामांपैकी आजपर्यंत ६४ कामे पूर्ण झाली आहेत. तर अद्यापही १०८ कामे अपूर्णावस्थेत असल्याची माहिती बुधवारी पार पडलेल्या स्थायी समिती सभेत देण्यात आली. जिल्हा परिषद स्थायी समिती सभा बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत आढावा देतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून गेल्या पाच वर्षात १७२ कामे मंजूर झाली. त्यापैकी ६४ कामे पूर्ण झाली आहेत. तर अद्यापही १०८ कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर २३८ कोटी ३२ लाख ४५ हजार निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती सभेत देण्यात आली. तर मंजूर झालेल्या कामांमध्ये सन २०१५-१६ मध्ये मंजूर झालेली ९ कामे पूर्ण झाली आहेत. सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेल्या ३७ कामांपैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत. सन २०१७-१८ मध्ये मंजूर झालेल्या ४१ कामांपैकी १४ कामे पूर्ण झाली आहेत. सन २०१८-१९ मध्ये मंजूर झालेल्या ३६ कामांपैकी ५ कामे पूर्ण झाली आहेत. तर सन २०१९-२० मध्ये मंजूर झालेल्या ४९ कामांपैकी आतापर्यंत केवळ ५ कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित गेल्या पाच वर्षातील सर्व १०८ कामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर आतापर्यंत पूर्ण झालेल्या ६४ कामांवर २३८ कोटी ३२ लाख ४५ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती स्थायी समिती सभेत बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

You cannot copy content of this page