मसुरे-देऊळवाडा येथील ४० वर्षीय इसमाची आत्महत्या
मालवण, दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा – लांबी येथील सेंटरिंग कारागीर विकास वासुदेव बागवे (वय- ४०) याचा मृतदेह घरालगतच्या मांगराच्या छतास दोरीचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला असून विकास याने आत्महत्या केली असावी असे बोलले जात आहे ही घटना काल रात्री ९ ते ९ .१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत मयत विकासचे वडील वासुदेव बागवे यांनी मसुरे पोलीस दुरक्षेत्रात खबर दिली आहे शालेय शिक्षणानंतर पुणे येथे काही वर्ष नोकरी केल्यानंतर विकास बागवे हा गोवा येथे चौगुले शिप कंपनीत नोकरीस होता. गावी आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी सेंटरिंगचे काम तो करायचा. गावातील धार्मिक, सामाजिक कार्यात तो सक्रिय सहभागी असायचा. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी काल रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व पंचनामा केला आज विकास बागवे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे करण्यात आल्यानंतर आज दुपारी देऊळवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्यामागे वडील, आई, काका, विवाहित बहीण, भावोजी, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. महावितरण कर्मचारी रुपेश सावंत यांचे ते भावोजी होत. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस कर्मचारी प्रमोद नाईक, विवेक फरांदे करत आहेत.
