अवकाळी मुसळधार पावसाचा फटका : रात्रभर ग्रामस्थ अंधारात
*⚡बांदा ता.२५-:* बुधवारी झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे विजेचा कडकडाट वीज पडून निगुडे येथील मुख्य ट्रान्सफॉर्मर जळून खाक निगुडे गावाला विद्युत पुरवठा करणारा ६३ केवी ट्रान्सफॉर्मर काल विजेमुळे जळून खाक झाला काल संपूर्ण दिवस निगुडे गाव रात्रभर अंधारात राहीला परंतु इमर्जन्सी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नव्हता निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी नागरिकांना होणारा त्रास रात्रभर लाईट नसल्यामुळे अनेकांचे होणार हाल लक्षात घेऊन महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री भुरे व बांदा शाखाअभियंता श्री अनिल यादव यांची भेट घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी सांगितले व त्या ठिकाणी ठेकेदार एस. एस. परब यांना बोलावून रात्री कुडाळ वरून ट्रांसफार्मर मागवण्यात आला सकाळी ०९:०० वाजता नवीन ट्रान्सफॉर्मर आणून बसवण्याचे काम सुरू केले परंतु जुना ट्रांसफार्मर हा ६३ केवी चा होता परंतु आता नवीन बसवण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर १०० केवी बसविण्यात आला यावेळी ट्रांसफार्मर बसविणे करता नागरिकांनी सहकार्य केले तसेच उपकार्यकारी अभियंता श्री भुरे, बांदा शाखा अभियंता श्री अनिल यादव ठेकेदार श्री एस एस परब विद्युत कर्मचारी श्री कुडव, इन्सुली पंचायत समितीचे माजी सदस्य श्री नारायण राणे, सावंतवाडी शहर विद्युत लाईनमन श्री चंद्रकांत निगुडकर, आदी सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचेही मनःपूर्वक आभार विद्युत पुरवठा लवकरात पूर्व रात झाल्यामुळे निगुडे सरपंच व उपसरपंच यांचे आभार ग्रामस्थांनी मानले.
