विविध विकास कामांची आ वैभव नाईक यांनी केली भूमीपूजने

नगरपालिकेच्या विविध योजनांतील कामांचा आहे समावेश

मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना सन २०२०- २१ अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे मालवण शहरात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मालवण शहरातील भरड भाट येथील चिपकर घर रस्ता डांबरीकरण व गटार बांधकाम करणे ( रु.६, २३, २९९), बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण ( रु.१५,८१,३५९), मालवण बस स्थानक समोरील दलीतवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (रु.१३, ९१,९४६), हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे (रु.२३,७६,९९६) या कामांचा समावेश आहे. या कामांचे भूमिपूजन आज दुपारी आमदार वैभव नाईक तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी मालवणचे नगरध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला संघटक पूनम चव्हाण, शहर प्रमुख बाबी जोगी, नगरसेवक यतीन खोत, नगरसेवक आप्पा लुडबे, नगरसेविका पुजा करलकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर अंजना सामंत, नंदा सारंग, उमेश मांजरेकर, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, प्रसाद आडवणकर, अमेय देसाई, यशवंत गावकर, काँग्रेसचे बाळू अंधारी, जेम्स फर्नांडिस, गणेश पाडगावकर व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page