Headlines

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सवाचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.०५-: माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचा रविवारी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा…

Read Full News

तेंडोली महोत्सवाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा…

मिलिंद नाईक:तेंडोली महोत्सव २०२६ चा शानदार शुभारंभ.. कुडाळ : तेंडोली हे कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर निसर्गरम्य असे गाव आहे. तेंडोली गावाकडे बघताना आम्ही रत्नाची खाण म्हणून बघतो. अनेक रत्न या गावात नावारुपाला आली. दशावतार क्षेत्रात तर अनेक कलावंत या गावात आहेत. रत्नाची खाण असलेले हे गाव आणि गावात साजरा होणारा हा तेंडोली महोत्सव…

Read Full News

कणकवली – सावंतवाडीतील सलग दुकानफोड्या; एकाच टोळीचा संशय, पोलिसांचा ‘अलर्ट मोड’…

⚡कणकवली ता.०५-: कणकवली शहरातील तब्बल दहा दुकाने फोडल्याच्या घटनेला २४ तासही उलटत नाहीत तोच सावंतवाडी शहरातही सहा दुकाने चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सलग घडामोडींमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून दोन्ही ठिकाणच्या घटना एकाच टोळीने केल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. कणकवलीत सना कॉम्प्लेक्ससह अन्य एका कॉम्प्लेक्समधील मेडिकल, जनरल स्टोअर्स, हॉटेल आदी…

Read Full News

स्थापना दिनानिमित्त हजारो घरांवर फडकणार भाजपाचा भगवा; विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना ध्वजवाटप…

स्थापना दिनानिमित्त हजारो घरांवर फडकणार भाजपाचा भगवा; विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना ध्वजवाटप.. ⚡सावंतवाडी, ता. ५-:भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथे ‘भाजपा ध्वज वाटप अभियान’ाचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना भाजपाचे ध्वज वितरित करण्यात आले.६ एप्रिल २०२६…

Read Full News

काळसेवाडी-बांदा येथे श्री सत्यनारायण महापूजा…

⚡बांदा ता.०५-: येथील श्री देव बनखनकर देवस्थान, काळसेवाडी – बांदा येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रति वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. ही महापूजा सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता संपन्न होणार आहे.महापूजनंतर दुपारी १२.०० वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. तसेच सायंकाळी ५.३० वाजता बांदा येथील महिला मंडळ यांचा…

Read Full News

कणकवलीत खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडी स्पर्धा; तब्बल २ लाखांची बक्षिसे…

⚡कणकवली ता.०५-: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे भव्य बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थापक अध्यक्ष तथा जि.प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत आणि माजी जि.प. सदस्या संजना सावंत यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा होत असून, यासाठी तब्बल २ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली…

Read Full News

सिंधुदुर्गातील खेळाडूंचे तायक्वांदो पंच परीक्षेत यश…

⚡कणकवली ता.०५-:तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. राष्ट्रीय पंच परीक्षेत कुणाल नारकर व सोनिया ढेकणे यांनी यश मिळवले, तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत व श्रीनिधी सावंत यांनी यश…

Read Full News

निरवडे महोत्सवात लोककला, संगीत आणि गुणवंतांच्या सन्मानाने रसिक मंत्रमुग्ध…

महिला बचत गट आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा गौरव;दोन दिवस चालला सांस्कृतिक जागर… ⚡​सावंतवाडी,ता.०५-: निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘निरवडे महोत्सव २०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावत ग्रामीण भागातील या कलाविष्काराचे आणि मंडळाच्या…

Read Full News

पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधूनहीबाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद…

नगरसेवक देव्या सुर्याजी यांची नाराजी: चोरीच्या घटनेनंतर तरी अधीक्षकांनी दखल घ्यावी.. ⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील बाजारपेठेतील बंद अवस्थेत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यासाठी पोलिस अधिक्षकांचे लक्ष वेधूनही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही अशी नाराजी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केली. आज शहरात चोरट्यांनी भर बाजारपेठेत चोरी केलेली असताना पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असते तर तपास काम…

Read Full News

डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत आरपीडीच्या जान्हवी पाटीलने पटकाविले सुवर्णपदक…

⚡सावंतवाडी ता.०५-: तालुक्यातील राणी पार्वतीदेवी हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी जान्हवी विश्वास पाटील हिने डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या तोंडी परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती या हेतूने मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ यांच्याकडून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली जाते. सन २०२५-२६ यावर्षीच्या…

Read Full News

You cannot copy content of this page