Headlines

बांद्यात कार व दुचाकी मध्ये अपघात…

दुचाकीस्वार गंभीर जखमी: सकाळी पावणे अकराची घटना, कारच देखील नुकसान.. ⚡बांदा ता०६-: मुंबई-गोवा महामार्गावर सटमटवाडी तपासणी नाक्यानजीक भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीवर बसलेल्या युवकाला जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार…

Read Full News

सावंतवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ…

सहा दुकानं फोडली: व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.. ⚡सावंतवाडी ता.०५-:कणकवली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाल्यानंतर आता सावंतवाडी शहरात इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.चोरट्यांनी एकूण सहा दुकानांना लक्ष्य केले असून एका दुकानातील रोख दोन हजार रुपये तर दुसऱ्या दुकानात पाच हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. तर…

Read Full News

मालवणात उद्या सकल हिंदू संमेलन…

⚡मालवण ता.०४-:मालवण दशक्राेशी मधील हिंदू समाजामध्ये स्वत्वाची जाणीव होऊन हिंदू समाजामध्ये ऐक्याची भावना कायम रहावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय, वायरी येथे सायंकाळी ४ वाजता हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदू संमेलनात प्रमुख व्याख्यात्यांच्या स्फूर्तीदायक व्याख्यानाबरोबरच मालवण मधील तरुण कलासंपन्न व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read Full News

मालवणात १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव…

फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचतर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.०४-:भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८:३० वा. समाजमंदिर मालवण येथे पूजापाठ, सकाळी ९ वा. समाजमंदिर…

Read Full News

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

वाढदिवसाच्या पैशातून केलेत्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान.. ⚡मालवण ता.०४-:अवास्तव खर्चातून वाढदिवसाचा आनंद मिळतो असे नाही तर साधेपणाने वाढदिवस साजरा करत वाचलेल्या पैशातून वंचितांना दानधर्म केल्यास जो आनंद मिळतो तो प्रेरणादायी असतो. याचा आदर्शत्रिंबक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च न करता साठलेल्या पैशांतून असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अन्नदानासोबत दैनंदिन गरजा…

Read Full News

भारतीय एकत्र कुटुंब पद्धती जगात श्रेष्ठ — डॉ सोमनाथ कदम…

⚡मालवण ता.०४-:भारतीय कुटुंब पद्धती ही जगात श्रेष्ठ आहे त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतातच पण वृद्ध दिव्यांग आजारी व्यक्ती यांना कुटुंबात सामावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की ते स्वतः पेक्षा इतरांच्या सुखाचे जास्त विचार करतात .त्यातूनच आनंद मिळवला जातो असे प्रतिपादन कणकवली कॉलेजचे प्राध्यापक डॉ सोमनाथ कदम यांनी येथे बोलताना केले आचरे येथील ऐश्वर्य…

Read Full News

मेढा येथील काळबादेवी मंदिराचा १३ व १४ रोजी वर्धापन दिन सोहळा…

⚡मालवण ता.०४-:मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १३ व १४ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत धार्मिक विधी त्रिशक्ती याग होम हवन, सायं. ५ वा. श्री देवी सातेरी प्रासादिक…

Read Full News

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी, ता. ०४-: भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त “संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६” अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे सुरू होणार आहे.या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये सामने खेळविण्यात येणार असून १३ वर्षांखालील मुले…

Read Full News

कोकणातील बागायतदारांच्या न्यायासाठी ‘चलो मुंबई’चा नारा…

अपुऱ्या नुकसानभरपाईवर बाळ माने यांचा संताप.. ⚡देवगड ता.०४-:सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे जिल्हे आंबा, काजू फलोत्पादन जिल्हे म्हणून नावारुपास आलेले असताना येथील बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणातील शेतकऱ्याला नुकसानभरपाईपोटी हेक्टरी २२ हजार रूपयांची आर्थिक मदत शासनाने जाहीर करून कोकणातील शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील शेतकऱ्यांनी उभारलेल्या लढ्याला आपला पूर्ण पाठींबा आहे. कोकणातील…

Read Full News

भाजपा स्थापना दिनानिमित्त सावंतवाडीत ६ रोजी विविध कार्यक्रम…

भाजप युवा नेते विशाल परब यांची माहित.. ⚡सावंतवाडी, ता. ४-: भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस ६ एप्रिल रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांनी दिली. ६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित…

Read Full News

You cannot copy content of this page