Headlines

मुंबईत कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026 चे उत्साहात उद्घाटन…

सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठा प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०४-: क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” या भव्य वास्तू प्रदर्शनाचे उद्घाटन आज दादर येथील क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे उत्साहात पार पडले. सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील प्रॉपर्टींना मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत आहे.क्रेडाई सिंधुदुर्ग आणि क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिवअभिजित जैतापकर, खजिनदार अनिल साखळकर यांच्या प्रयत्नातून क्रीडा…

Read Full News

प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी यांचे हृदयविकाराने निधन…!

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील लेदर बॉल क्रिकेटचे प्रशिक्षक यासीन मुलाणी (वय 60, रा. कारिवडे -साईलनगर ) यांचे आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असता त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. याचवेळी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली दहा वर्षे बऱ्याच क्रिकेटपटूंना ते क्रिकेटचे प्रशिक्षण देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,…

Read Full News

मळगाव तेलकाटावाडी येथे १० व ११ रोजी तेलकाटा उत्सव…

१० एप्रिल रोजी ‘स्वरसंध्या व बालनाट्य कार्यक्रम:११ रोजी एकपदा अर्थात पृथ्वीकंकण ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मळगाव तेलकाटावाडी येथील सूयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळावतीने आयोजित “तेलकाटा उत्सव” अंतर्गत १० व ११ एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वाजता ‘स्वरसंध्या’ हा सुमधुर संगीत कार्यक्रम होणार असून यामध्ये गायक…

Read Full News

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद…

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य:पालकमंत्री नितेश राणे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०४-: जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. जनतेच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळावा आणि प्रशासन अधिक…

Read Full News

दीपक केसरकर यांच्या निधीतून दांडेलीवाडीत रस्ता कामाचा शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.०४-: दांडेली येथील दांडेलीवाडी मुख्य रस्ता ते मनोहर परब यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये मंजूर झाले असून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी ४ लाख रुपये श्री. केसरकर यांच्या विकास निधीतून…

Read Full News

आंबा-काजू बागायतदारांना जाहीर झालेली मदत तुटपुंजी…

मदत वाढवण्याची महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सची मागणी:उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब आणि नकुल पार्सेकर यांची पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.०४-: शासनाने आंबा-काजू बागायतदारांना जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत हि अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे द्राक्ष बागायतदारांना शासन मदत देते त्या धर्तीवर आंबा-काजू बागायतदारांना मदत द्यावी. त्यासाठी गरज भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मॉनिटरिंग कमिटी स्थापन करावी. आंबा-काजू बागायतदारांचे…

Read Full News

किनळे येथे ११ एप्रिल ला “चौथरा” नाटक…

⚡सावंतवाडी ता.०४-: किनळे येथील माऊली सातेरी रंगमंचावर शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी रात्रौ १० वाजता माऊली कृपा नाट्य वृंद , किनळे प्रस्तुत सामाजिक हृदयस्पर्शी दोन अंकी “चौथरा” या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.या नाटकाचे लेखक यशवंत माणके असून, दिग्दर्शक दशरथ नाईक, निर्माता राजाराम नाईक, नेपथ्य यश रंगमंच आरोंदा, रंगभूषा उमेश कोंडये, पार्श्वसंगीत सत्यवान नाईक यांचे…

Read Full News

शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यावरून शेतकरी व पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…?

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचं मत:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिगती महामार्गावर एकही एक्झिट प्रस्तावित नसल्याने स्थानिक विकासावर परिणाम.. ⚡सावंतवाडी ता.०४-: राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. सुधारित आराखड्यानुसार महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार असून त्याची एकूण लांबी ८०६ किमीवरून वाढवून ८५६ किमी करण्यात आली आहे.या नव्या मार्गात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read Full News

आखाती देशातील युद्धाची झळ, गावातील शाळा अंगणवाड्यांनासुद्धा…

पोषण आहार साठी पारंपारिक चुलीचा आधार.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सध्या सगळीकडे गॅस टंचाईचे सावट दिसत असून, गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.या गॅस टंचाईमुळे रोजचा जीवनक्रम बदलल्याचे दिसत असताना गावागावात पूर्वी प्रमाणे चुलीवर जेवण करावे लागत आहे.गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्यामुळे याचा साहजिकच फटका शाळा ,अंगणवाड्यांना बसत आहे. शाळेतील,अंगणवाड्यातील मुलांचा रोजचा…

Read Full News

श्री साईबाबांच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी, ता. ४-:श्री साईबाबांच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता साईंची पूजा, अभिषेक व आरतीने होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ३ या…

Read Full News

You cannot copy content of this page