⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक व विविध सभापतींनी त्यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप शहर मंडल अध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांभुरे, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना यावेळी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
