⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग डायओसेशन एज्युकेशनल ट्रस्ट संचालित मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे दिनांक 15 जून 2026 रोजी प्रवेशोत्सवाचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी तालुक्याचे माननीय तहसीलदार श्री श्रीधर पाटील , मिलाग्रीस इंग्लिश प्रायमरी चे नवनिर्वाचित मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्विस, मॅनेजर फादर मिलेट डिसोजा, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक प्रतिनिधी श्री प्रदीप देसाई सर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथम नवनिर्वाचित मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्विस तसेच माननीय तहसीलदार श्री श्रीधर पाटील यांचा शाल व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
पाहुण्यांचे प्रशालेच्या शिक्षकांच्या पारंपरिक ढोल पथकांच्या गजरात स्वागत करण्यात आले .शाळेची आकर्षक सजावट करण्यात आली होती.तसेच प्रशालेतर्फे नूतन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय वह्या व रोपट्याचे वितरण करून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सावंतवाडी तालुक्याचे माननीय तहसीलदार श्री श्रीधर पाटील सर यांनी शाळेच्या उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शैक्षणिक प्रवाहात शाळेचे महत्व अधोरेखित केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणामध्ये नवीन सुरुवातीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ शारदा गावडे यांनी केले.
