केवळ दैवबलवत्तर म्हणून रिक्षेमधील प्रवासी थोडक्यात बचावले..
⚡सावंतवाडी ता.१५-: शिरोडावरून सावंतवाडीच्या दिशेने दिगंबर शंभा केरकर (आरोंदा) हे आपल्या ताब्यातील रिक्षेत एक प्रवासी (MH.07 .AH.1246) घेऊन सावंतवाडी येथे जात असतानाच आजगाव वाघबीळ येथे वळणावर सावंतवाडी ते रेडी येथे (MH.09.GJ.9747) एम डी सोहेल (झारखंड) हा ट्रक घेऊन जात असताना रिक्षा चालकाच्या अंगावर आल्याने मोठा अपघात घडला.मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून रिक्षाचालक आणि त्यातील प्रवासी सुदैवाने बचावले.मात्र रिक्षा तेथील झाडावर आदळल्यामुळे रिक्षेचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश मयेकर (तिरोडा) यांनी अपघाताची माहिती देताच शिरोडा पोलीस व वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी रिक्षेतील जखमी प्रवासी श्रीम.पेडणेकर यांना तत्काळ शिरोडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर रिक्षा चालक दिगंबर केरकर यांना किरकोळ दुखापत झाली.मात्र त्यांच्या रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
यावेळी अपघातस्थळी दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.यावेळी शिरोडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल दीपा मठकर,हवालदार प्रसाद कदम ,योगेश मांजरेकर ,वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे मंगल मोखरे,कॉन्स्टेबल अनिल जाधव
घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
बांधकाम विभागाने आजगाव वाघबीळ येथील वाढलेली झाडी,तुटलेली लोखंडी संरक्षक रेलिंग दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे असून,या वळणावर वाहनधारकांना वाहन चालवताना या वाढलेल्या झाडीमुळे समोर आलेले वाहन दिसत नाही.तसेच या वाघबीळ रस्त्याच्या बाजूला खोल दरी असून सुद्धा बांधकाम विभागा तुटलेल्या संरक्षकर रॅलींगडे पूर्णतः डोळे झाक करत असल्यामुळे वाहनचांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.एखादी मोठी दुर्घटनेची संबंधित विभाग वाट बघतात काय .असा संतप्त सवाल ग्रामस्थ,वाहनचालक करत आहेत.
