Headlines

कणकवलीत पहाटे चोरट्याचा धुमाकूळ; सहा दुकाने फोडली…

⚡कणकवली ता.०४-: शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली. आचरा रोडसारख्या नेहमी गजबजलेल्या मार्गावर ही चोरी घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचरा रोडवरील सना कॉम्प्लेक्समधील तीन दुकाने तसेच काही अंतरावर असलेल्या बेंगलोर अय्यंगार बेकरीच्या बाजूच्या राज मेडिकलसह आणखी तीन दुकानांची शटर उचकटून…

Read Full News

धनगर समाज भवन उभारणीसाठी निर्णायक पाऊल…

कुडाळ येथे विशेष बैठक आयोजित.. ⚡वैभववाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित असलेली ‘समाज भवन’ उभारणीची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ठीक २:३० वाजता कुडाळ एमआयडीसी (MIDC) येथील शासकीय विश्रामगृहात समाज बांधवांच्या एका…

Read Full News

परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई…

निवती समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची धडक मोहीम.. ⚡वेंगुर्ला, ता. ०४-: महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने निवती समोरील समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई करत ती जप्त केली आहे.दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी,…

Read Full News

शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांचे विस्थापन सहन करणार नाही…

साईप्रसाद काणेकर यांचा इशारा: वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू.. ⚡बांदा ता.०४-: राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत ठाकरे शिवसेनेने स्पष्ट भूमिका मांडत विकासाला पाठिंबा दर्शवला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार असेल तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला…

Read Full News

कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटना स्थापन…

अध्यक्षपदी शिल्पा घुर्ये यांची निवड.. ⚡कुडाळ ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारणी सदस्य संजय भोगटे यांच्या पुढाकाराने कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली. यावेळी कुडाळ तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व कुडाळ तालुका व्यापारी संघटना यांच्याशी संलग्न असलेल्या या कुडाळ तालुका महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. शिल्पा हरेश घुर्ये…

Read Full News

निरवडे महोत्सव २०२६ चा विशाल परब यांच्या हस्ते उत्साहात शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०४-: निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ, माळकरवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य “निरवडे महोत्सव २०२६” ची आज जल्लोषात सुरुवात झाली. आकर्षक फूड फेस्टिवल आणि रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीमुळे हा महोत्सव निरवडेवासीयांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांच्या हस्ते झाले….

Read Full News

पर्यावरणमित्र ही संकल्पना युवकांच्या मनात दृढ व्हावी…

महादेव शिंगाडे:अनुभव शिक्षा केंद्र आयोजित पर्यावरण परिषदचे मालवणात उद्घाटन.. ⚡मालवण ता.०३-: अनुभव शिक्षा केंद्र, महाराष्ट्र आयोजित तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचे उदघाटन बॅ. नाथ पै सेवांगण येथे मालवण वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांच्या हस्ते झाले. सध्याच्या हवामान बदलांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, कोकणातील पर्यावरणीय समस्या समजून घेत पर्यावरणमित्र ही संकल्पना युवकांच्या मनात दृढ व्हावी, असे मत…

Read Full News

मालवणात १४ रोजी जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा…

⚡मालवण ता.०३-:विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त समाज मंदिर, बांगीवाडा मालवण येथे ‘बुद्ध भीमगीते’ जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. १४ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. होणार असून, जिल्ह्यातील नृत्यगटांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत प्रथम पारितोषिक ९,९९९ रुपये, द्वितीय पारितोषिक ७,९९९ रुपये, तृतीय पारितोषिक ५,९९९…

Read Full News

वायरी भूतनाथ जाधववाडी येथील रस्ता काम बोगस…

हरी खोबरेकर यांचां आरोप:स्वतःची पोटे भरण्यासाठी केलेली निकृष्ट कामे खपवून घेतली जाणार नाही.. ⚡मालवण ता.०३-:वायरी भूतनाथ जाधववाडी ते रेवंडकर घर या रस्त्याचे काम बोगस पद्धतीने होत असून रस्त्यासाठी काँक्रीटच्या साईड वॉलमध्ये लॅटेराईट दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर केला जात असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे, स्वतःची पोटे भरण्यासाठी केलेली निकृष्ट…

Read Full News

श्री मठ संस्थान दाभोलीश्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज श्री मठ येथे वार्षिकोत्सव..

“भक्तनिवास” चे रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीतऔपचारिक उदघाटन.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: श्री मठ संस्थान दाभोलीश्रीमत् पूर्णानंद स्वामी महाराज श्री मठात २६४ वा श्री गुरु महापुण्यतिथी वार्षिकोत्सव रविवार दि. ५ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यकम संपन्न होणार असून येथील नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवास चे औपचारिक उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती सचिन…

Read Full News

You cannot copy content of this page