आयुष हॉस्पिटलसाठी दोडामार्ग-धारगळ कदंबा बससेवा सुरू करण्याची भाजपाची मागणी…

⚡दोडामार्ग ता.१४-: तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांचा विचार करून दोडामार्ग ते धारगळ येथील आयुष हॉस्पिटलदरम्यान नियमित कदंबा बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी दोडामार्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांच्याकडे केली.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक रुग्ण विविध आजारांच्या तपासणी व उपचारांसाठी धारगळ येथील आयुष हॉस्पिटलमध्ये नियमितपणे जात असतात. मात्र, दोडामार्ग ते धारगळ या मार्गावर थेट आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
दोडामार्ग, मणेरी, सासोली, इब्रामपूर, हणखणे आदी गावांतील नागरिकांना या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे. सध्या खासगी प्रवासी वाहनांची संख्या मर्यादित असल्याने अनेकांना आर्थिक भार तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कदंबा महामंडळाने नागरिकांची गरज लक्षात घेऊन या मार्गावर तातडीने नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, कसई-दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, प्रवीण गवस, समीर रेडकर, सुमित म्हाडगूत, कल्पेश गवस, पिकी कवठणकर, तनुज ताटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page