⚡सावंतवाडी ता.१४-: जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देण्याचे कार्य विशाल परब यांनी सातत्याने केले आहे. शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना सहाय्य, युवकांना प्रोत्साहन तसेच नागरिकांच्या विविध समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा अशा माध्यमातून त्यांनी जनतेशी नाते जोडले आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत छत्री वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून समाजातील गरजू घटकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देत विशाल परब यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्धीपेक्षा जनसेवेला प्राधान्य देणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे.
यावेळी सावंतवाडी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, शहराध्यक्ष निलेश नाटेकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, गुरु कल्याणकर, दादू कविटकर, बाळा आकेरकर, सिद्धेश महाजन, हेमंत दाभोलकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, सदा राणे, प्रवीण पंडित, निलेश पटेकर, बाळा पेडणेकर, स्मिता पेडणेकर, बाबा काणेकर, मनोज कल्याणकर, बापू कदम आदी उपस्थित होते. त्यांनी विशाल परब यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
