Headlines

‘इतिहास कट्टा’चा कुडाळमध्ये शुभारंभ…

शिवचरित्रातून इतिहासाची उजळणी.. कुडाळ : इतिहासाची गोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इतिहास कट्टा’ या उपक्रमाची सुरुवात कुडाळ येथे उत्साहात करण्यात आली. शिवप्रेमी संघटना आणि इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, ३ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.लहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधून जशी इतिहासाची ओळख मनात रुजते, त्याच धर्तीवर इतिहास अधिक जिवंत आणि…

Read Full News

देवगडमध्ये खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.०५-:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजपच्या वतीने ५ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता “इको व्हीलर ग्रुप देवगड सायकल रॅली (देवगड सायकलोथॉन)” उत्साहात पार पडली.या सायकल रॅलीचा शुभारंभ माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि तालुकाध्यक्ष राजा भुजबळ…

Read Full News

कलमठमध्ये अपुरा व दूषित पाणीपुरवठा…

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांची पाणीपट्टी कपातीची मागणी.. ⚡कणकवली ता.०५-: कलमठ गावात मागील काही वर्षांपासून जानेवारी महिन्यानंतर ग्रामपंचायतीकडून नियमित व मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी ग्रामपंचायत कलमठचे सरपंच व संबंधित…

Read Full News

चव्हाटा मंदिर सभागृहाचा कोनशीला समारंभ संजू परब यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न..!

⚡दोडामार्ग ता.०५-: येथील चव्हाटा मंदिर सभागृहाच्या बांधकामाचा कोनशीला समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मोरगाव गावातील मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान चव्हाटा मंदिर सभागृह उभारणीमुळे गावातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली….

Read Full News

देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार…

उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजप पक्ष प्रवेश.. ⚡देवगड ता.०५-: देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे शालघालून पालकमंत्री नितेश राणे यांनीभाजपात स्वागत केले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थितीत होते.जामसंडे-देवगड येथील अनेक…

Read Full News

मालवणी भाषा भवन उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे:’रिल्स मालवणी’चा शानदार मालवणी अवॉर्ड्स सोहळा.. ⚡कुडाळ ता.०५-: मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केली. मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा जन्मदिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मालवणी भाषा दिनाचे औचित्य साधून कुडाळ येथे रिल्स मालवणीच्या वतीने शनिवारी रात्री…

Read Full News

हरी खोबरेकर यांच्या दणक्यानंतर वायरी येथील ते बोगस काम पतन विभागाने हटवले…

⚡मालवण ता.०५-: मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर सुरू झाले आहे. मात्र या रस्ता कामाच्या साईड वॉलमध्ये काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिला होता. खोबरेकर यांच्या या दणक्यानंतर पतन विभागाकडून हे निकृष्ट…

Read Full News

वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी कोकण विकास संस्थेचा “सक्षम बुक बँक” उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.०५-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकारातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी “सक्षम बुक बँक” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ वाचनालयांना सुमारे १००० हून अधिक पुस्तके भेट देण्यात आली.याच अनुषंगाने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील वाचनालयास संस्थेच्यावतीने पुस्तके प्रदान करण्यात आली….

Read Full News

कळसुलकर हायस्कूलची विद्यार्थिनी अवनी बावकर हिची इस्रो सफरसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अवनी रामनाथ बावकर हिने शैक्षणिक वर्ष-२०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये १७० गुणांनी गुणवत्ता यादीत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये अव्वल येऊन प्रशालेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलेला आहे. या यशामुळे तिची सिंधूरत्न संस्थान तर्फे इस्रो सफरीसाठी…

Read Full News

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई…

२२.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त: आंध्रप्रदेशातील दोघांना घेतले ताब्यात.. ⚡बांदा ता.०५-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुली येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे २२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपासणी नाका इन्सुली येथे ५ एप्रिल रोजी…

Read Full News

You cannot copy content of this page