ग्रामपंचायतीकडून प्रलंबित काम पूर्ण…

नागरिकांची गैरसोय दूर:शिवसेना ठाकरे गट व शहर विकास आघाडीच्या पुढाकाराने गटारावर फरशी बसवली..

⚡बांदा ता.१६’: बांदा शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील उभाबाजार परिसरातील गटारावर बांदा शिवसेना (ठाकरे गट) व बांदा शहर विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने फरशी बसविण्याचे काम करण्यात आले. नवीन गटाराचे बांधकाम पूर्ण होऊनही ग्रामपंचायतीकडून बराच काळ फरश्या न घातल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना (ठाकरे गट) व बांदा शहर विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत गटारावर फरशी बसवून मार्ग सुकर केला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून संबंधितांनी या कामाचे स्वागत केले आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शहरप्रमुख साई काणेकर यांच्यासह ओंकार नाडकर्णी, अर्णव स्वार, सुशांत पांगम, अजय महाजन, सुनील नाटेकर, गजानन गायतोंडे, जहूर शेख, राजेश पावसकर, राकेश विरनोडकर, रितेश नाटेकर, अजिंक्य पावसकर, अमेय पावसकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी परिसरातील इतर नागरी समस्याही तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
फोटो:-
बांदा उभाबाजार येथे गटारावर फरशी बसविण्यात आली.

You cannot copy content of this page