⚡वैभववाडी ता.१५-: शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्याचे नूतन गटशिक्षणाधिकारी थोरात साहेब यांची विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला भेट देऊन नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्सवात करण्यात आली या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील विद्या मंदिर नावळे धनगरवाडा शाळेला गटशिक्षण अधिकारी थोरात साहेब यांनी भेट देत नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले.
. यावेळी सरपंच सोनल गुरव शाळा समिती अध्यक्ष शर्वरी रावराणे शाळा समितीचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके सचिन गुरव मुख्याध्यापक संतोष भरडकर उपशिक्षक जयकुमार माने. शिक्षिका वर्षा होटकर पिसे मॅडम आधी आधी ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभववाडीत शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे उत्साहात स्वागत…
