⚡सावंतवाडी ता.१५-:
वेत्ये सारख्या एका छोट्या गावातील युवक डॉक्टर होणे हे संपूर्ण गावासाठी भूषणावह आहे. सुयोगने घेतलेले अथक परिश्रम, मेहनत आणि जिद्दीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे, असे गौरवद्गार पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी काढले.
सावंतवाडीचे माजी सभापती रमेश गावकर यांचे सुपुत्र सुयोग गावकर हे एमबीबीएस (MBBS) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री. गावकर बोलत होते.
पुढे बोलताना जितेंद्र गावकर म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी जिद्द बाळगून परिश्रम घेतल्यास ते आपल्या जीवनात निश्चितच एक वेगळी उंची गाठू शकतात. वेत्ये सारख्या गावातून डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुयोगने गावाचे आणि आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले आहे. त्याचा हा प्रवास इतर मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. सुयोगने वैद्यकीय क्षेत्रात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी, अशा सदिच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.या सत्कार समारंभाला बाबुराव तेंडुलकर, संतोष गावडे, रमेश गावकर, तनवी गावकर आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
वेत्ये गावच्या सुयोग गावकरचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण; जितेंद्र गावकर यांच्याकडून गौरव…
