वेंगुर्ला एस. टी. आगारामार्फत शालेय बसफेऱ्या 15 जूनपासून सुरु…

श्री.नवज्योत गावडे ;
शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास पास योजना..

⚡वेंगुर्ला ता.१४-: वेंगुर्ला एस. टी. आगारामार्फत उन्हाळा सुट्टी कालावधीत स्थगित करण्यात आलेल्या काही शालेय विद्यार्थी प्रवासी एस. टी. बसफेऱ्या सोमवार दि. 15 जून 2026 पासून पूर्ववत सुरु करण्यात येणार आहेत, याबाबतची माहिती वेंगुर्ला एस. टी. आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली.
यामध्ये वेंगुर्ला – वडखोल सकाळी 9.35 वाजता,
वेंगुर्ला – वडखोल सायंकाळी
4.55 वाजता, वेंगुर्ला –
वायंगणी सकाळी
6.45 वाजता, वेंगुर्ला –
वायंगणी सायंकाळी 4.40 वाजता, वेंगुर्ला –
तेंडोली सायंकाळी
4.25 वाजता, तेंडोली –
वेंगुर्ला सायंकाळी 5 वाजता,
वेंगुर्ला – वेतोरे सायंकाळी
4.10 वाजता, वेतोरे –
वेंगुर्ला सायंकाळी 4.45 वाजता, वेंगुर्ला –
न्हैयचीआड सकाळी
10 वाजता, न्हैयचीआड –
वेंगुर्ला सकाळी 10.30 वाजता, वेंगुर्ला –
पाट हायस्कुल
6 वाजता, पाट हायस्कुल –
वेंगुर्ला 7 वाजता,
वेंगुर्ला – सावंतवाडी
8 वाजता, सावंतवाडी –
वेंगुर्ला 9.30 वाजता,
वेंगुर्ला – कुडाळ
1.30 वाजता, कुडाळ
वेंगुर्ला 1.30 वाजता,
शिरोडा सातार्डा शिरोडा
6 वाजता अशा एकूण 17 बसफेऱ्या बसफेऱ्या सोमवार (दि. 15 जून ) पासून सुरु होणार आहेत. वेंगुर्ला एस. टी. आगारामार्फत शालेय विद्यार्थिनींसाठी “अहिल्याबाई होळकर एस टी बस मोफत प्रवास पास योजना” राबविण्यात येत आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना घर ते शिक्षण संस्था या प्रवासासाठी मोफत एसटी पास रा. प. वेंगुर्ला आगारामार्फत दिला जाणार आहे. सदरचा पास इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या मुलींना दिला जाणार आहे. विद्यार्थिनींकडून सदरच्या पासाकरिता ओळखपत्रासाठी पाच रुपये आणि फॉर्म पाच रुपये असे एकूण दहा रुपये घेतले जाणार आहेत. तसेच सदरचा पास हा पूर्ण वर्षभर करिता मोफत असणार आहे. रा.प. वेंगुर्ला आगाराकडून प्रत्यक्षात वेंगुर्ला तालुक्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला भेट देऊन सदरचे पासेस वितरित केले जाणार आहेत. तरी सर्व विद्यार्थिनींनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला एस. टी. आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page