भाजपा जनसंपर्क कार्यालयात ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

विशाल परब यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव..

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते केक कापून तसेच पुष्पगुच्छ व शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देऊन ॲड. निरवडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ॲड. निरवडेकर यांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला ॲड. अनील निरवडेकर यांच्यासह भाजपा युवा नेते विशालजी परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नितीन राऊळ, मायकल डिसोजा, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबूरे, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, विलास जाधव, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, भाजपा आंबोली मंडल युवामोर्चा सरचिटणीस स्वप्नील राऊळ, उपाध्यक्ष सुहास राऊळ, संदेश बिडये, विकास परब, मकरंद तोरसकर, साहिल कल्याणकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, गोविंद साटेलकर, बूथ अध्यक्ष सुमित वाडकर, सेबेस्तीन फर्नांडीस, गोपाळ नाईक, पुंडलीक कदम, साई परब, गुरू पेडणेकर, महेश डोंगरे, सुधीर मळीक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page