Headlines

कणकवलीत आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम…

दहा ते बारा बंद स्टॉल केले जप्त..

⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा वेग आला असून मंगळवारी दुपारी ३ वाजल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने उड्डाण पुलाखालील पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा विविध ठिकाणी धडक कारवाई सुरू केली.

उड्डाण पुलाखालील बंद असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करताना बंद अवस्थेतील स्टॉलदेखील जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान सुमारे १० ते १२ स्टॉल जप्त करून ट्रॅक्टरमधून नगरपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम थांबली की काय, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत होता. मात्र प्रशासनाने आज पुन्हा प्रत्यक्ष कारवाई सुरू करून या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये पुन्हा एकदा धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कारवाईत नगरपंचायतीच्या अक्षता रोळे, सोनाली खैरे, विभव करंदीकर, रवी माडेश्वर, प्रशांत राणे, मनोज धुमाळे, संजय राणे, अविनाश सददेकर, प्रदीप गायकवाड, संतोष राणे, विशाल वरवडेकर, ध्वजा उचले आणि सतीश कांबळे आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

प्रशासनाकडून अतिक्रमण हटाव मोहीम आगामी काळातही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page